बर्फाचा गोळा म्हटलं की आपल्याला लाकडी काडीवर गोलाकार चेपलेला किंवा ग्लासमध्ये असलेल्या सिरपमध्ये बुडवून जिभल्या चाटत खाण्याचा रंगीबेरंगी गोळा आठवतो. पण तोच बर्फाचा गोळा तुम्हाला कुणी प्लेटमध्ये दिला तर? ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना? पण खरोखरच हा पदार्थ म्हणजे आपल्या नेहमीच्या गोळ्यापेक्षा एक पाऊल पुढे आणि वेगळा आहे. सध्या वाढलेल्या उकाडय़ावर पोट भरणारा आणि मन तृप्त करणारा जालीम उपायच ठरावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कनुभाई नंदानी हे मूळचे गुजरातमधील राजकोटचे. त्यामुळे मुंबईत स्थायिक असूनही राजकोटला सतत ये-जा असे. तिथेच त्यांनी हा प्रकार पहिल्यांदा पाहिला. मुंबईच्या लोकांची खवय्येगिरी त्यांच्या चांगल्याच परिचयाची असल्याने त्यांनी राजकोटहून हा पदार्थ थेट मुंबईत आणला. त्याला वेगळी ओळख प्राप्त करून दिली. १९८८ साली त्यांनी बोरिवलीमध्ये पूजा मलई गोळाची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे प्लेटमध्ये गोळा मिळत असला तरी जवळपास २६ वर्षांपूर्वी मिळत असलेल्या गोळ्यामध्ये आणि आत्ता २०१६ साली मिळत असलेल्या गोळ्यामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत. केवळ सात ते आठ वेगवेगळ्या फ्लेवर्सपासून सुरू झालेला हा मामला आता तब्बल १४०हून अधिक वेगवेगळ्या फ्लेवर्सवर येऊन पोहोचला आहे. त्यामध्येही साधा, मलाई, ड्रायफ्रूट अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनसोबत गोळा तयार करण्याच्या पन्नास वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा आहेत. लोकांना आवडतात असे १९ प्रकार सध्या नियमितपणे मिळत असले तरी ग्राहकांच्या मागणीनुसार हवा त्या फ्लेवर्सचा गोळा येथे बनवून दिला जातो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous ice gola in borivali
First published on: 28-05-2016 at 02:05 IST