29 October 2020

News Flash

शेतकऱ्याला साडेनऊ लाखांचा ऑनलाइन गंडा

डोंगरी पोलिसांकडून तपास सुरू

डोंगरी पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : वाई येथील शेतकऱ्याला मोहिनी अस्त्राने घायाळ करून साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामटय़ांची शोधाशोध डोंगरी पोलीस करत आहेत. माझगावच्या उमरखाडी परिसरात या शेतकऱ्याचे एक घर आहे. फेब्रुवारी महिन्यात फेसबूकवर त्याची मर्सी ग्रेस नावाच्या परदेशी तरुणीशी ओळख झाली. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क-संवाद वाढला. तरुणीने ती अमेरिके ची नागरिक असून तेथील लष्करात कप्तानपदी कार्यरत असल्याचे तक्रोरदाराला सांगितले. तसेच  आठ हजार अमेरिकन डॉलर भारतात गुंतवावे, व्यवसाय सुरू करावा, अशी इच्छा व्यक्त के ली आणि मदतीचे आवाहन के ले. पुढे तिने स्वत:हूनच शॉपिंग मॉलची कल्पना सुचवली, भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमंत्रणही दिले. तक्रोरदाराने त्याला होकार दिला.

तरुणीने जॉन के नडी या व्यक्तीसोबत मुंबईत आठ लाख अमेरिकन डॉलर पाठवते, असे  कळवले. मात्र के नडी मुंबईऐवजी दिल्ली विमानतळावर उतरल्याने आणि त्याच्याकडे परदेशी चलन मोठय़ा प्रमाणावर असल्याने कस्टम डय़ुटी भरल्याशिवाय विमानतळाबाहेर सोडणार नाहीत, असे सांगितले. तक्रोरदाराने तिच्या सांगण्यावरून टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये साडेनऊ लाख रुपये भरले. इतकी रक्कम भरूनही मर्सीने आणखी सहा बँक खात्यांचे तपशील पाठवून त्यावर आणखी रक्कम भरण्याची विनंती सुरूच ठेवली. तेव्हा तक्रोरदाराला फसवणूक होत असल्याची जाणीव झाली. त्याने तातडीने डोंगरी पोलीस ठाणे गाठून तक्रोर दिली.

सायबर महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी आफ्रि का खंडातील तरुण अशाप्रकारचे घोटाळे सर्रासपणे करत. या गुन्ह्य़ाची सुरुवात समाजमाध्यमांवरून परदेशी तरुणींशी ओळख, मैत्रीतून होत असे. बहुतांश तक्रोरदार तरुणींच्या मधाळ बोलण्यात गुंतून, आमिषाला बळी पडून फसले,   विशेष म्हणजे समाजमाध्यमांद्वारे रुपवती तरुणींच्या छायाचित्रांआड आफ्रि कन तरुण तक्रोरदारांशी संवाद साधत. या प्रकरणातही  मर्सी नावाने बनावट खाते तयार करून, आकर्षक तरुणीचे छायाचित्र जोडून भलत्याच व्यक्ती संवाद साधत असाव्यात, असा अंदाज या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

नौदल अधिकारीही लक्ष्य

आयएनएस आंग्रेवर नेमणुकीस असलेल्या नौदल अधिकाऱ्याला पेटीएम के वायसीबाबत लघुसंदेश ँपाठवून ऑनलाइन भामटय़ांनी दीड लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणाचा तपास कफ परेड पोलीस करत आहेत. एनी डेस्कप्रमाणे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून भामटय़ांनी तक्रोरदार नौदल अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून २५ हजार रुपयांचे सहा व्यवहार परस्पर के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 1:31 am

Web Title: farmer cheated online for 9 lakh by facebook friend zws 70
Next Stories
1 प्रभाग समिती निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप आमने-सामने
2 पश्चिम रेल्वेच्या अपंग प्रवाशांना लोकल प्रवासाची प्रतीक्षा
3 मुखपट्टय़ा न लावणाऱ्यांविरोधात आता पोलीस कारवाई
Just Now!
X