कृषीमंत्री दादा भुसे यांचे मत; शेतकरी, संघटना आणि शासन यांच्यात चर्चेसाठी व्यासपीठ

मुंबई : प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी हे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत, अशा शब्दांत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमात राज्यातील शेतकऱ्यांची प्रशंसा केली. निसर्गावर अवलंबून असलेली शेती लहरी हवामानाच्या दुष्टचक्रातून सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकरी बांधवांना त्यातून बाहेर काढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’

शेतकरी संघटना आणि शासन यांच्यात दुवा म्हणून कृषी विभाग काम करणार या संकल्पनेला आज मूर्त स्वरूप देत कृषीमंत्री भुसे यांनी राज्यातील विविध शेतकरी संघटना, प्रयोगशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी यांना आपले विचार, कैफीयत, कृषी विकासासाठीच्या उपाययोजना मांडण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद देत सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकरी प्रतिनीधींनी सहभाग घेतला.

गेल्या अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग झाला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना थेट कृषिमंत्री आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर व्यथा मांडता आल्या, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या भावना या वेळी व्यक्त केल्या. कृषी विकासाच्या योजना राबविताना त्या सकारात्मक पद्धतीने राबवण्यात येतील, अशी ग्वाही कृषीमंत्र्यांनी दिली.

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत, आमदार जयंत पाटील, राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, कृषी तज्ज्ञ किशोर तिवारी, अजित नवले, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, प्रयोगशील व पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी सुचवले उपाय..

तुमचा भाऊ  म्हणून मला व्यथा सांगा, असे आवाहन भुसे यांनी केले, आणि राज्यभरातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी विविध उपाययोजना सुचविल्या. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनापर्यंत व्यथा पोहोचल्याची भावनाही अनेकांनी या वेळी व्यक्त केली.