News Flash

मुंबईत फॅशन डिझायनर पित्याचे दुष्कृत्य, अल्पवयीन मुलींवर केला बलात्कार

मुंबईत राहणाऱ्या ४२ वर्षांच्या फॅशन डिझायनरला चार मुलं आहेत. त्याला १७, १३ आणि १० वर्षांची अशा तीन मुली आहे. तर त्याचा लहान मुलगा तीन वर्षांचा

मुंबईत फॅशन डिझायनर पित्याचे दुष्कृत्य, अल्पवयीन मुलींवर केला बलात्कार
प्रतिकात्मक छायाचित्र

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या ४२ वर्षांच्या नराधम पित्याला मुंबई पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. नराधम हा फॅशन डिझायनर असून त्याने १७ आणि १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलींनी आईला हा प्रकार सांगताच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

मुंबईत राहणाऱ्या ४२ वर्षांच्या फॅशन डिझायनरला चार मुलं आहेत. त्याला १७, १३ आणि १० वर्षांची अशा तीन मुली आहे. तर त्याचा लहान मुलगा तीन वर्षांचा आहे. नराधम पित्याने त्याच्या १७ आणि १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. १७ वर्षांच्या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, दोन वर्षांपूर्वी तिच्या आईला बरे नसल्याने ती तिच्या खोलीत झोपली होती. याच दरम्यान नराधम पित्याने मोठ्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास शिक्षणासाठी पैसे देणार नाही आणि घरीच बसावे लागेल, अशी धमकी तो द्यायचा. तसेच आईला वेश्या व्यवसायात ढकलू, लहान भावाची हत्या करु, अशा धमक्या तो पीडितेला द्यायचा. यामुळे घाबरुन तिने हा प्रकार आईला सांगितला नाही. यानंतरही नराधमाने पीडितेवर अत्याचार सुरुच ठेवले.

गेल्या वर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये नराधमाने त्याच्या आणखी एका मुलीवरही लैंगिक अत्याचार केले. मोठी मुलगी आणि दुसरी मुलगी या दोघी खोलीत टीव्ही बघत होत्या. यादरम्यान विकृत पित्याने त्यांच्या खोलीत प्रवेश केला आणि दुसऱ्या मुलीसोबत अश्लील चाळे केले. मोठ्या मुलीने त्याला रोखण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, यानंतर त्याने मोठ्या मुलीवरही बलात्कार केला. दोन दिवसांपूर्वी पित्याचे अत्याचार असह्य झाल्याने अखेर मोठ्या मुलीने धाडस दाखवत आईला वडिलांनी केलेल्या अत्याचारी माहिती दिली. तिने पतीला जाब विचारला. मात्र, त्याने पत्नीलाच मारहाण केली. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सोमवारी नराधम पित्याला अटक केली आहे. बलात्कार आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 11:32 am

Web Title: fashion designer father arrested for raping two daughters in mumbai
Next Stories
1 म्हाडात यंदा अत्यल्प उत्पन्न गटाची लॉटरी, हजारपैकी ८०० घरं राखीव
2 आत्मसमर्पण केलेले ६० नक्षलवादी एसटीत वाहक
3 २०११ पर्यंतच्या झोपडीवासीयांना घरे
Just Now!
X