15 August 2020

News Flash

‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा ‘मराठा लाईट इन्फण्ट्री’मध्ये संग्रह

सैन्यदलातील संग्रहात समाविष्ट होणारा पहिला मराठी चित्रपट

सैन्यदलातील संग्रहात समाविष्ट होणारा पहिला मराठी चित्रपट

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या आणि मराठय़ांच्या गनिमी गाव्याच्या युद्धनीतीची विस्तृत मांडणी करणाऱ्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाचा बेळगाव येथील ‘मराठा लाईट इन्फण्ट्री’च्या संग्रहात समावेश करण्यात आला आहे. सैन्यदलातील संग्रहात समाविष्ट होणारा ‘फत्तेशिकस्त’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

शिवकालीन युद्धनीतीचे दर्शन घडवणारा ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित झाला. दर्जेदार पटकथा, विषय मांडण्याची शैली आणि कलाकारांचा कसदार अभिनय या गुणांच्या जोरावर या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे यांच्यासह अनेक कलाकारांनी रुपेरी पडद्यावर शिवकालीन इतिहास जिवंत केला. हा चित्रपट बेळगाव येथील मराठा लाईट इन्फण्ट्रीच्या प्रशिक्षण केंद्रात जवानांनी पाहिल्यावर त्याचे कौतुक केले. अष्टावधानी नेतृत्व, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा पराक्रम, गनिमी कावे, युद्धापूर्वीची शिस्तबद्ध तयारी, शत्रूची माहिती मिळवून कोंडीत पकडण्याची कला ही शिवरायांची गुणवैशिष्टय़े सैनिकांसाठी प्रेरणादायी आहेत.

चित्रपटाच्या संग्रहातील समावेशाबाबत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना विचारले असता, ‘सैनिकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने निर्मात्यांनी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फण्ट्री येथील प्रशिक्षण वर्गात चित्रपट दाखवला.

चित्रपट पाहिल्यानंतर शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास मराठा बटालियनमधील सैनिकांना व्हावा या हेतूने या चित्रपटाचा समावेश संग्रहात करावा, असे मराठा लाईट इन्फण्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले.’ हा चित्रपट बेळगावच्या ‘दि मराठा लाईट  इन्फण्ट्री’ रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर गोविंद कलवाड, डेप्युटी कमांडंट कर्नल पी. एल. जयराम, बेळगावचे समशेर बहाद्दूर हरोलीकर सरकार यांच्या सहकार्याने दाखवण्यात आला.

मराठा लाईट इन्फट्रीचा इतिहास

‘मराठा लाईट इन्फट्री’ ही भारतीय सैन्यदलातील २५० वर्षे म्हणजे सर्वात जुनी तुकडी आहे. ‘ब्रिटिश लष्करातील सर्वात जंगी पलटण’ अशी त्याची ओळख होती. १८०२ च्या सुमारास त्याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. ही रेजिमेंट चपळ हालचालींसाठी ओळखली जाते. अनेक युध्दात मराठा रेजिमेंटने पराक्रम गाजवले आहेत. आतापर्यंत या पलटणीने ५६ युद्ध लढली आहेत. मराठा रेजिमेंटचे‘बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’ हे घोषवाक्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 2:58 am

Web Title: fatteshikast movie directed by digpal lanjekar in maratha light infantry regimental center zws 70
Next Stories
1 ‘अमेरिका गॉट टॅलेंट’मध्ये वसई-भाईंदरचे नृत्यपथक अव्वल
2 करोना वायरसचा ‘जेम्स बॉण्ड’लाही फटका
3 ‘लँड करा दे’ फेम तरुण आता स्वयंवरात घेणार भाग
Just Now!
X