News Flash

जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची भीती

प्राणवायूबाबत स्वयंपूर्ण होण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यापूर्वी आपण प्राणवायूच्या बाबतीत स्वंयपूर्ण झाले पाहिजे. प्रत्येक तालुक्यात प्राणवायूचा प्रकल्प  तयार पाहिजे. प्राणवायूसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही. तिसऱ्या लाटेच्यावेळी प्राणवायू नाही ,अशी सबब कोणालाही सांगता येणार नाही, याची सर्वांना दक्षता घ्यावी ,असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी राज्यातील विभागीय आयुुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे राज्यात निर्बंध आणखी पंधरा दिवस वाढविण्यात आले असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी दूृरचित्रसंवादाच्या माध्यमातून राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच करोना नियंत्रण कृती गटाचे तज्ज्ञ सहभागी झाले होते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कठोर निर्बंृध लागू असल्याने करोना बाधितांचा आकडा काहींसा नियंत्रणात आला असला तरी आजही ६५ हजारच्या पुढे आहे. त्यामुळे सध्याचे निर्बंध आणखी पंधरा दिवस वाढविण्यात आले असून त्यांची कठोर अंमलबजावणी करावी. लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्याचेही टोेपे यांनी  बैठकीनंतर सांगितले.

राज्यात सध्या आवश्यक तितका म्हणजेच १७१५ टन प्राणवायू  पुरवला जात आहे. तसेच प्राणवायूची गरज लक्षात घेऊन हवेतून प्राणवायू शोषूण घेणारे १२५  प्रकल्प राज्यभरात उभे राहत असून त्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यातील काही प्रकल्प येत्या दहा- पंधरा दिवसात सुरूही होतील. तसेच प्राणवायूचा काटकसरीने वापर करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.  गरजेच्या तुलनेत रेमडेसिविरची इंजेक्शन आज दहा ते पंधरा हजार कमी पडत आहेत.  त्यामुळे रेमडेसिविरचा वापर मर्यादित प्रमाणात करावा.  अनावश्यक वापर करुन त्याचा रुग्णांवर विपरित परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

महानगरामध्ये करोनासह अन्य गंभीर आजारी रूग्णांना आवश्यक ते सर्व उपचार मिळण्याची व्यवस्था आहे. पण ग्रामीण भागातील  छोट्या शहरात  करोनासह अन्य गंभीर आजार असलेल्या रूग्णावर उपचारासाठी टेलिमेडिसिनचा परिपूर्ण वापर झालाच पाहिजे. त्यासाठी मुंबई, पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊन उपचार द्यावेत अशाही सूचना दे्यात आल्या आहेत. लसीकरणाबाबतही सरकार प्रयत्नशील असले तरी लसी मिळविणे आव्हानात्मक झाले आहे. २०-२५ लाख मात्र मिळाल्याशिवाय १८-४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू करायचे नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लस खरेदीचे कार्यादेश दिले जातील. या दोन्ही कं पन्यांनी लसीचे दर कमी के ल्याने दिलासा मिळाला आहे. तसेच कंपन्यांना सीएसआरमधून करोनासाठी खर्च करण्याची मुभा देण्यात आली असून राज्यातील अनेक उद्योगांनी आता करोनाच्या लढयात मदतीची ग्वाही दिल्याचे टोपे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 1:00 am

Web Title: fear of a third wave in july august abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लसीकरण तीन दिवस बंद
2 मुंबईच्या आर्द्रतेत वाढ
3 ४१९२ नवे रुग्ण, ८२ मृत्यू
Just Now!
X