एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तान्हुल्याला स्तनपान देता यावे यासाठी महामंडळाच्या जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानकांवर खास ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. या महिना अखेरीस हे कक्ष सुरू होतील.प्रवासात तान्हुल्यांना स्तनपान देताना महिलांची कुचंबणा होते. हे लक्षात घेऊन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षाजवळ असलेल्या ८ बाय १० फूट आकाराच्या या हिरकणी कक्षामध्ये केवळ तान्ह्य  मुलांसह असलेल्या महिलांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. हा कक्ष सहज ओळखता यावा यासाठी त्याच्या बाहेरील बाजूस लहान मुलांची चित्रे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सहाय्यक जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी दिली.