05 April 2020

News Flash

अश्लील व्हिडीओ बघण्यासाठी बळजबरी; गणेश आचार्यविरोधात पोलिसांत तक्रार

महिला नृत्य दिग्दर्शिकेचा आरोप

‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशन’चे सचिव आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याविरोधात एका महिला नृत्य दिग्दर्शिकेने खळबळजनक आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेने राज्य महिला आयोग आणि अंबोली पोलिसांत तक्रार केली आहे. आपल्या उत्पन्नातून कमिशन देण्याची मागणी करत अश्लील व्हिडीओ बघण्यासाठी बळजबरीही करण्यात आली असल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.

चित्रपटसृष्टीत महिला छळवणुकीच्या आणि लैगिंक शोषणाच्या घटना नवीन नाही. ‘मीटू’मुळे अनेक बॉलिवूडमधील अनेक महिला कलाकारांनी स्वतःवर झालेल्या अत्याचारांची वाच्यता केली होती. अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर पुन्हा एक घटना समोर आली आहे. एका ३३ वर्षीय महिला नृत्य दिग्दर्शिकेनं प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

सदरील महिलेने राज्य महिला आयोग आणि पोलिसांत याविषयी तक्रार दाखल केली आहे. “आपल्या उत्पन्नातून कमिशन मागण्याबरोबरच मला अश्लील व्हिडीओ बघण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. चित्रपटात मला काम मिळू न देण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे.

गणेश आचार्य हे बॉलिवूडमधील नृत्य दिग्दर्शकांपैकी एक आघाडीचं नाव आहे. गणेश आचार्य यांनी अनेक गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं असून, त्यांना टॉयलेट : एक प्रेम कथा सिनेमातील गोरी तू लाथ मार गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 10:14 am

Web Title: female choreographer filed a complaint against choreographer ganesh acharya bmh 90
Next Stories
1 ब्रेकअप झाल्यानंतर कमल हासनच्या लेकीला लागलं होतं ‘हे’ व्यसन
2 दिशा पटानीच्या ‘मलंग’ सिनेमाचे अँजेलिना जोली कनेक्शन
3 शेवंताला मिळणार का नाईकांच्या वाड्यात प्रवेश?
Just Now!
X