बेस्टच्या केवळ दोन विशेष बसगाडय़ा; गर्दीच्या वेळी धक्काबुकी

मुंबई : नियमितपणे सुरू झालेल्या बेस्ट बसमधील प्रवाशांची गर्दी सांभाळताना बेस्टच्या नाकीनऊ येत असून यात सर्वाधिक कुचंबणा महिला प्रवाशांची होत आहे. नियमित सेवेदरम्यान महिलांकरिता ५४ मार्गावर फे ऱ्या देणारी बेस्ट सध्या के वळ दोनच विशेष महिला गाडय़ा चालवते आहे. महिलांकरिता या फे ऱ्या अत्यंत अपुऱ्या असल्याने धक्काबुक्की सहन करत त्यांना कार्यालयीन वेळेत प्रवास करावा लागत आहे.

८ जूनपासून बेस्ट नियमितपणे सुरू झाली तरी मर्यादित फे ऱ्या, प्रचंड प्रवासी संख्या, रेल्वे-मेट्रो बंद असल्याने येणारा ताण यांमुळे दररोज गर्दी, धक्काबुक्कीला तोंड देत प्रवाशांना कार्यालय गाठावे लागत आहे. त्यात सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजलेले दिसतात. करोनाची लागण झालेले बेस्ट चालक-वाहक, अन्य कर्मचारी व करोनाच्या के वळ धास्तीने गैरहजेरी लावणारे कर्मचारी यांमुळे बेस्टला आपला संपूर्ण ३,५०० गाडय़ांचा ताफा रस्त्यावर उतरवताना अडचणी येत आहेत. त्यात ६०० बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे ताफ्यात ३,५०० असूनही फक्त २,५०० बस चालवाव्या लावत आहेत. अपुऱ्या गाडय़ांमुळे प्रवाशांना बस थांब्यावर तासनतास वाट पाहावी लागते. यामध्ये मोठी गैरसोय होते ती महिलांची. बेस्ट बसमधील प्रवासात महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. बस मिळालीच तर त्यात प्रवेश करणे मोठी कसरत असते. गर्दीत पुरुष प्रवाशांची धक्काबुक्की सहन करत प्रवेश करावा लागतो. प्रवेश मिळाला तरी बसण्यासाठी जागा मिळेलच असे नाही. त्यात सामाजिक अंतर न पाळता सहप्रवाशांशी खेटून उभे राहावे लागते. अनेकांना नाइलाजाने कार्यालय गाठावे लागत असल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

बेस्टचे सध्याचे प्रवासी

दिवस         बसगाडय़ा       प्रवासी                उत्पन्न (रुपयांत)

८ जून          २,१३२                ४,१९,१५३       ४०,४४,७७९

९ जून          २,३०८                 ४,७३,६८०       ४५,५३,०२८

१० जून       २,४००                 ५,२६,३८८       ४८,६३,७६७

७५ वरून दोनवर

टाळेबंदीआधी मुंबईत महिला प्रवाशांसाठी ५४ मार्गावर ७५ पेक्षा जास्त बस फे ऱ्या धावत होत्या. आता के वळ दोन तेजस्विनी बसगाडय़ांची सेवा विक्र ोळी ते बॅकबे आगार अशी सुरू आहे. बेस्टच्या ताफ्यात ३७ महिला तेजस्विनी बसगाडय़ा आहेत. सध्या मनुष्यबळाची समस्या असून त्यामुळेच टप्प्याटप्यात सेवा सुरू के ली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट के ले.