लोकल गाडय़ांमध्ये कटलरी साहित्य विकणाऱ्या चार महिलांकडून दरमहा १०५० रुपयांचा हफ्ता घेणाऱ्या विद्युलता बारामतीकर (४८) या ठाणे रेल्वे पोलीस दलातील महिला हवालदारास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.
 या घटनेमुळे रेल्वे स्थानकातील फेरीवाले आणि विक्रेत्यांकडून सुरू असलेल्या हफ्तेबाजीचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे, कळवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, अशा सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. या फेरीवाल्यांना पोलीस विभागाचे संरक्षण असल्याची चर्चा होती. लोकल गाडय़ा तसेच रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून बारामतीकर दरमहा १०० रुपये हफ्ता गोळा करत असे. यामध्ये वाढ करून तो २५० रुपये करावा, असा दम तिने फेरीवाल्यांना भरला होता.  बारामतीकर यांनी हफ्त्याची रक्कम वाढवून देण्यास नकार देताच‘तुझ्यावर केस टाकते’, असा दमही एका फेरीवाल्या महिलेला भरला.त्यामुळे त्रस्त फेरीवाल्या महिलांनी बारमतीकर हिला इंगा दाखवायचे ठरविले आण् िालाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप कर्णिकांची भेट घेतली. त्यानंतर  दिवा रेल्वे स्थानकात सापळा रचून बारामतीकरला अटक करण्यात आली.
दरम्यान, तक्रारदार फेरीवाल्या महिला अशिक्षित असतानाही त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्याची िहमत दाखवली. त्यामुळे तक्रारदार महिला आणि तिच्या १२ सहकाऱ्यांचा ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सत्कार केला आहे.