22 November 2017

News Flash

डोंबिवली फीवर-२

गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत विचित्र तापाची साथ आली असून या ‘डोंबिवली फीवर- २’च्या लक्षणांमुळे

प्रतिनिधी, डोंबिवली | Updated: November 24, 2012 5:16 AM

गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत विचित्र तापाची साथ आली असून या ‘डोंबिवली फीवर- २’च्या लक्षणांमुळे येथील डॉक्टरही हैराण झाले आहेत. हा ताप एकदा आल्यानंतर दहा ते बारा दिवस कमी होत नाही. उपचार केल्यानंतर काही काळासाठी ताप उतरतो; पण पुन्हा त्यात चढउतार होत राहतात. रुग्णाला सलग दहा ते बारा दिवस ताप येत असल्याने आणि सर्व प्रकारचा औषधोपचार करूनही तो ताप कायमचा जात नसल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या तापाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.
विविध प्रकारचे जंतू, वातावरणातील बदलामुळे हा ताप येतो. हा ताप प्रसंगी मलेरिया, टायफॉइडवरही जाऊ शकतो. मिक्स व्हायरल प्रकारचा हा ताप असल्याने या तापाच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या तरी त्यामधून काहीही निष्पन्न होत नाही. अशा प्रकारच्या तापाचे निदान डॉक्टरांना होत नाही, असे पालिकेतील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
याबाबत पालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर म्हस्के यांनी सांगितले की, आतापर्यंत अशा प्रकारच्या तापाची तक्रार आपणाकडे आलेली नाही. असे काही असेल, तर आपण शनिवारी डॉक्टरांची बैठक घेऊ.
साथीच्या आजारांची तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. घरोघरी जाऊन याबाबत तपासणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

First Published on November 24, 2012 5:16 am

Web Title: fever in dombivali
टॅग Docter,Fever