News Flash

‘५० टक्केच कर्मचाऱ्यांना कामावर बोलवावे’

करोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.

मुंबई : मुंबईमधील शाळा, महाविद्यालय, मॉल्स, चित्रपटगृह, नाटय़गृह बंद करण्याच्या निर्णयापाठोपाठ आपत्कालीन सेवा वगळता खासगी कंपन्या आणि संस्थांनी ५० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलविण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

करोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन वारंवर पालिकेकडून करण्यात येत आहे. करोनाचा धास्तीमुळे शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मॉल्स, चित्रपटगृह, नाटय़गृहही बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यापाठोपाठ आता खासगी कंपन्या आणि संस्थांमधील ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात बोलविण्याबाबत नियोजन करण्याचे आदेशही प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालिकेचे उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. या आदेशांचे पालन न करणाऱ्या कंपन्या वा संस्थांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, असे आदेशही प्रवीणसिंह परदेशी यांनी पालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

प्लॅटफॉर्म तिकीट १० वरून ५० रुपये

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाच्या शुल्कात १८ मार्चपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १० रुपये असलेले तिकीट थेट ५० रुपये केले असून त्यामुळे टर्मिनसवर नातेवाईकांना सोडण्यास आलेल्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत हा नियम लागू राहील. मध्य आणि पश्चिम रेल्वेसह अन्य विभागातील स्थानकांचा यात समावेश आहे.

वाहन चालकांना  परवान्यासाठी प्रतीक्षा

  • मुंबई: शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी काही वाहन चालकांना आता एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. लर्निग लायसन्ससाठी (शिकाऊ अनुज्ञप्ती)आरटीओकडून देण्यात आलेल्या परीक्षांच्या तारखांत बदल करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला आहे.
  •  करोनामुळे आरटीओतील गर्दी टाळण्यासाठी ज्यांना ३१ मार्चच्या आत लर्निग लायसन्स मिळणार होते, अशा काही जणांना ३१ मार्चनंतरच लर्निग लायसन्सची प्रक्रिया करावी लागणार आहे.
  • चालकाच्या मोबाईलवर तसे संदेश पाठवले जाणार असून त्याची अंमलबजावणी येत्या दोन दिवसांत केली जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली. राज्यात ५० प्रादेशिक परिवहन आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 1:21 am

Web Title: fifty percentage office invite employees akp 94
Next Stories
1 कस्तुरबात रुग्णांचा वाढता ओघ
2 मुंबईत करोना रुग्णाचा मृत्यू
3 ‘करोना’चर्चेसाठीच्या बैठकीत रस्तेदुरुस्तीचा प्रस्ताव
Just Now!
X