05 December 2020

News Flash

मराठा आरक्षणासाठी सामर्थ्यांनिशी लढा -मुख्यमंत्री

हे सरकार तुमचेच असून तुमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध

(संग्रहित छायाचित्र)

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सर्व सामर्थ्यांने लढा देत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमरगा ते मुंबई असा ५८० किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरुणांना दिली. तसेच हे सरकार तुमचेच असून तुमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी या तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उमरगा तालुक्यातील बाळासाहेब माने, पंकज जगताप, अक्षय गायकवाड, साहेब जाधव, नितीन जाधव आणि विश्वजीत चुंगे या युवकांनी उमरगा ते मुंबई असा ५८० कि.मी.चा प्रवास पायी केला. यासाठी त्यांना १३ दिवस लागले. गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षां निवासस्थानी भेट घेऊन आपले निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी करून मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 12:31 am

Web Title: fight with strength for maratha reservation abn 97
Next Stories
1 करोना रुग्ण महिलेचा डॉक्टरकडून विनयभंग
2 रेल्वेची चालढकल
3 अर्धा अभ्यासक्रम झाल्यावर राज्यमंडळाचे शिक्षक प्रशिक्षण
Just Now!
X