छोट्या पडद्यावरील बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे आणि मोठ्या पडद्यावरील आपल्या बिनधास्त वावराने सर्वांना लक्षात असलेली अभिनेत्री डॉली बिंद्राला आज अज्ञात इसमाने धमकावण्याचा प्रयत्न केला. आज (बुधवार) सकाळी जोगेश्वरी परिसरात ही घटना घडली. एका अज्ञात इसमाने डॉली बिंद्राला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. बिंद्रा यांनी मोठमोठ्याने ओरडायला सुरूवात केल्यानंतर त्या इसमाने तेथून पोबारा केला. त्यानंतर बिंद्रा यांनी ओशिवरा पोलिस स्थानकात जाऊन सदर घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस त्या अज्ञात इसमाचा शोध घेत आहेत.
डॉली बिंद्रा यांनी  बिच्छू, खिलाडी ४२०, स्टाईल, यादें सारख्या बड्या बॅनरच्या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तर रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या चौथ्या सिझनमध्ये त्यांनी शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते.