23 January 2021

News Flash

Drugs Case: चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला NCB कडून अटक; समन्सही बजावले

सकाळी केलेल्या कारवाईत त्यांच्या घरातून काही प्रमाणात ड्रग्ज जप्त

समीर वानखेडे, एनसीबीचे मुंबई झोनचे संचालक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला अंमलीपदार्थ नियंत्रण विभागानं (एनसीबी) रविवारी अटक केली. एनसीबीच्या मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज अँगलची एनसीबीकडून कसून तपास केला जात आहे. याअतंर्गत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचीही चौकशी करण्यात आली आहे.


बॉलिवूड अभिनेत्रींनंतर आता एनसीबीच्या टीमने बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरावर छापा टाकला. शनिवारी रात्री उशीरा छापेमारीच्या कारवाई दरम्यान बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरुन एनसीबीच्या टीमने काही प्रमाणात ड्रग्ज आढळून आले. त्यानंतर एनसीबी नाडियादवाला यांना समन्स पाठवण्याच्या तयारीत आहे.

एनसीबीने नाडियादवाला यांच्या घरातून १० ग्रॅम गांजा आढळून आला आहे. त्याचबरोबर एनसीबीच्या टीमने त्यांच्या घरातून फोनही जप्त केला आहे. ज्यावेळी एनसीबीने ही कारवाई केली त्यावेळी ते घरी उपस्थित नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2020 7:39 pm

Web Title: film producer firoz nadiadwalas wife has been arrested today aau 85
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’, फुकटच्या टीमक्या.. – अतुल भातखळकर
2 निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त; एनसीबीची कारवाई
3 “सुशांत सिंह बद्दलची भावना भाजपा नेत्यांना अन्वय नाईक यांच्याबद्दल का वाटत नाही?”
Just Now!
X