News Flash

सुप्रसिद्ध निर्मात्या-दिग्दर्शक कल्पना लाज्मी यांचे निधन

गेल्या काही वर्षांपासून मुत्रपिंडाच्या कर्करोगाशी त्या झुंज देत होत्या. रविवारी पहाटे त्यांनी कोकीलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

२००६ साली त्यांनी 'चिंगारी' या शेवटच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.

सुप्रसिद्ध निर्मात्या-दिग्दर्शक कल्पना लाज्मी यांचे रविवारी पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या कर्करोगानं ग्रासलेल्या कल्पनाजींनी मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात पहाटे साडेचार वाजता अखेरचा श्वास घेतला. त्या ६१ वर्षांच्या होत्या.

ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहाय्यक निर्मात्या म्हणून या क्षेत्रात पदार्पण केलं. प्रसिद्ध चित्रकार ललिता लाज्मी यांच्या त्या कन्या होत्या. तर, चित्रपट निर्माते गुरुदत्त हे त्यांचे मामा होते. भारतीय स्त्रीचं भावविश्व अगदी थेटपणे समाजासमोर मांडणाऱ्या अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच प्रभावी निर्मात्या-दिग्दर्शक आणि सर्वोत्तम पटकथाकाकर त्या होत्या. जगप्रसिद्ध लेखिका महाश्वेतादेवी यांच्या कथेवर आधारित ‘रुदाली’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. या चित्रपटातून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख चित्रपटसृष्टीत निर्माण केली.

२००६ साली त्यांनी ‘चिंगारी’ या शेवटच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. गेल्या काही वर्षांपासून मुत्रपिंडाच्या कर्करोगाशी त्या झुंज देत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 9:58 am

Web Title: filmmaker kalpana lajmi passes away after a long battle with kidney cancer
Next Stories
1 विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई-नवी मुंबईतील अनेक रस्ते बंद, जाणून घ्या वाहतूक व्यवस्था
2 विघ्न कायम ! पेट्रोल-डिझेलची शतकाकडे आगेकूच
3 पुढच्या वर्षी लवकर या ! बाप्पा निघाले गावाला
Just Now!
X