News Flash

३४ रस्त्यांमधील ८२ घोटाळेबाज संशयाच्या भोवऱ्यात

गुन्ह्य़ाची तीव्रता लक्षात घेऊन दोषींच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबईमधील तब्बल २०० रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्याचा अंतिम अहवाल पुढील आठवडय़ात पालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येणार असून या कामांमध्ये नियम, अटी-शर्तीचे कमी प्रमाणात उल्लंघन झाल्याचे उजेडात आले आहे. रस्ते कामाची चौकशी सुरू झाल्यामुळे आपल्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये या भीतीपोटी २०० रस्त्यांच्या कामात कसूर होऊ नये याबाबत अभियंते, अधिकाऱ्यांनी सावधानता बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र यापूर्वी ३४ रस्त्यांच्या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या ९६ पैकी ८२ जणांवर २०० रस्त्यांच्या घोटाळ्यात ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. गुन्ह्य़ाची तीव्रता लक्षात घेऊन दोषींच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नालेसफाईप्रमाणेच रस्त्यांच्या कामांमध्येही भ्रष्टाचार होत असून रस्ते कामांचीही चौकशी करावी, अशी मागणी माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना गोपनीय पत्र पाठवून केली होती. या पत्राची गंभीर दखल घेत अजोय मेहता यांनी रस्ते कामांच्या चौकशीचे आदेश दिले होते. पहिल्या टप्प्यात ३४ रस्त्यांची चौकशी करण्यात आली असून चौकशी अहवालात रस्ते अहवालातील सुमारे १०० पैकी ९६ अधिकारी- कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. यांपैकी चौघांना बडतर्फ करण्यात आले, तर उर्वरित अधिकारी- कर्मचाऱ्यांना पदावनती, वेतन कपात आणि रोख दंड अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे.

अभियंता, अधिकाऱ्यांचा सावध पवित्रा

दुसऱ्या टप्प्यातील २०० रस्त्यांच्या कामाचा चौकशी अहवाल पूर्ण झाला असून पुढील आठवडय़ात या रस्त्यांचा अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. ३४ रस्त्यांच्या घोटाळा प्रकरणात दोषी आढळलेल्या ८२ अभियंत्यांवर २०० रस्त्यांच्या कामातही ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. या ८२ अभियंते- अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या गुन्हय़ाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला सांगितले. पहिल्या टप्प्यात ३४ रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली. त्याच दरम्यान मुंबईत सुमारे २०० रस्त्यांची कामे सुरू झाली होती. या कामांचीही चौकशी होण्याची शक्यता संबंधितांनी लक्षात घेतली आणि आपण कोणत्याही घोटाळ्यात अडकू नये यासाठी अभियंता, अधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे चौकशीदरम्यान निदर्शनास आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे रस्ते कामाच्या निकषांचे कमी प्रमाणात उल्लंघन झाल्याचे उजेडात आले आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 2:50 am

Web Title: final report on road scam in mumbai will submitted to bmc commissioner next week
Next Stories
1 चार वर्षांत तब्बल १० हजार रुग्ण पसार!
2 लेखापरीक्षकांकडून दोन वर्षांपूर्वीच इशारा
3 पीएनबी घोटाळा : गोकुळनाथ शेट्टींसह तिघांना अटक
Just Now!
X