अंतिम वर्षांच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी रस्ते वाहतुकीशिवाय अन्य पर्याय नसल्याने उपनगरी रेल्वे  प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. याबरोबरच स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवासाची मुभा असेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.  ओळखपत्र आणि परीक्षा प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे.  गैरसोय होऊ नये यासाठी स्थानकात अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू ठेवल्या जातील. प्राधान्याने सर्व अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन होणाऱ्या असल्या तरीही अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा देण्याचीही मुभा दिली आहे. प्रात्यक्षिक व लेखी मिळून सप्टेंबर व ऑक्टॉबरमध्ये या परीक्षा होणार आहेत.