News Flash

…अखेर महाविकासआघाडी सरकार वरमलं – दरेकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सभागृहात 'ती' घोषणा करण्यात आल्याबद्दल दिली प्रतिक्रिया

संग्रहित

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोध पक्ष भाजपाने विविध मुद्यांवर आक्रमक होत महाविकासाघाडी सरकारला धारेवर धरेल. तर, थकीत वीजबिलामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करण्याच्या मुद्यावरून भाजपा आमदारांनी राज्य सरकारविरोधात विधानभवनाच्या पायरीवर बसून निषेध नोंदविला. तसेच, करोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहातही मोठा गोंधळ उडाला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.

सक्तीने वसुली व वीज जोडण्या खंडित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला केलेल्या प्रखर विरोधापुढे अखेर महाविकास आघाडी सरकार वरमलं, विजेच्या सक्तीच्या वसुलीस व कनेक्शन खंडित करण्याच्या निर्णयाला अखेर सरकारला स्थगिती द्यावी लागली. असं ट्विट दरेकर यांनी केलं आहे.

तर या अगोदर, आघाडी सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, हे मी वेळोवेळी सांगतोय. या सरकारने नागरिकांना आधी वाढीव वीज बिले दिली आणि आता सामान्य नागरिकांच्या वीज तोडणीसह शेतकऱ्यांच्या पंपांची देखील वीज तोडली जात आहे. हा सरळसरळ अन्याय आहे. अशी टीका दरेकर यांनी केली होती.

‘वीज कनेक्शन तोडणी’ला स्थगिती; अजित पवारांची विधानसभेत घोषणा

दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला आज सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यावरून भाजपा आक्रमक झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 4:37 pm

Web Title: finally the mahavikasaghadi government was defeated darekar msr 87
Next Stories
1 Mumbai Blackout : “…तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर का मांडला नाही?”
2 मोबाइलसाठी तरुणीवर जीवघेणा हल्ला; कॉटन ग्रीन-शिवडी स्थानकादरम्यान धक्कादायक घटना
3 मुंबईकरांनो, ‘या’ रेल्वे स्थानकांवर जाण्याआधी विचार करा; प्लॅटफॉर्म तिकीटात पाचपटीने वाढ
Just Now!
X