गेल्या काही दिवसांपासून २६ हजारापासून लांब राहणाऱ्या सेन्सेक्ससारख्या व्यवहारात सद्यस्थितीत काय करावे? तूर्त या टप्प्याची वाट बघावी की आहे त्या स्थितीचा स्वीकार करावा? अशा कोडय़ात टाकणाऱ्या प्रश्नांची उकल गुरुवारी, २८ एप्रिल रोजी होणार आहे. निमित्त आहे ‘लोकसत्ता’च्या ‘अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन आणि ‘आर्थिक गुंतवणुकीच्या सल्ल्या’चे!

‘आर्थिक आरोग्याची गुरुकिल्ली’ समजला जाणारा ‘लोकसत्ता’चा २०१६-१७ साठीचा ‘अर्थब्रह्म’ हा विशेषांक २८ एप्रिल रोजी प्रकाशित होत आहे. रिजेन्सी ग्रुप प्रस्तुत आणि बीएनपी पारिबास म्युच्युअल फंड यांचे सहप्रायोजकत्व लाभलेल्या या उपक्रमासाठी (पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, केसरी आणि नातू परांजपे) प्रवेश विनामूल्य आहे.