मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज सादर केला.  हा अर्ज सादर करताना त्यांनी आपल्या एकूण संपत्तीचे विवरण दिले आहे. यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जवळपास 125 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिज्ञापत्र अद्याप निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही.

उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं एकही वाहन नाही. दोन बंगले व एक फार्म हाऊस आहे. याशिवाय विवध कंपन्यांचे शेअर्स, कंपन्यांधील भागीदारी व त्यांचे डिव्हिडंड हे त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत असल्याची नोंद यामध्ये असल्याची सुत्रांची माहिती आहे.

आतापर्यंत ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीवरून अनेकदा प्रश्न निर्माण झालेले होते. मात्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा व आज उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेचा अर्ज केल्याने निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांना संपत्तीचे विवरण द्यावे लागले आहे.