News Flash

चुकीचा सल्ला देणाऱ्या सल्लागाराला तुटपुंजा दंड

जोगेश्वरी येथे उभारण्यात आलेले ट्रॉमा सेंटर सल्लागारांनी योग्य सल्ला न दिल्याने पाण्याच्या पाइपलाइनवर उभारण्यात आले आहे. मात्र असा चुकीचा सल्ला देणाऱ्या सल्लागाराला पालिकेने अगदी

| March 14, 2013 05:35 am

जोगेश्वरी येथे उभारण्यात आलेले ट्रॉमा सेंटर सल्लागारांनी योग्य सल्ला न दिल्याने पाण्याच्या पाइपलाइनवर उभारण्यात आले आहे.  मात्र असा चुकीचा सल्ला देणाऱ्या सल्लागाराला पालिकेने अगदी किरकोळ दंड ठोठावला आहे.
आजगावकर मैदानात उभारण्यात आलेल्या ट्रॉमा सेंटरचा खर्च पालिकेच्या आणि सल्लागारांच्या आडमुठय़ा धोरणामुळे १४ कोटींनी वाढला. त्यामुळे संबंधित सल्लागाराकडून हा खर्च वसूल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली.मात्र दंडापोटी सल्यापोटी दिल्या जाणाऱ्या साडेपाच टक्के रकमेऐवजी साडेतीन टक्के रक्कम दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 5:35 am

Web Title: fine to who gives the wrong suggestion
टॅग : Fine
Next Stories
1 बांगलादेशींना आसरा देणाऱ्या बिल्डरांवर कारवाई
2 कामगारांची घरे बांगलादेशींना!
3 बेरोजगारांच्या संस्था भ्रष्टाचाराचे कुरण! – वळसे पाटील
Just Now!
X