एमआरए मार्ग पोलिसांनी शनिवारी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. आरोपी पीएसआयने तक्रारदार तरुणीबरोबर सोशल मीडियावरुन मैत्री केली होती. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
आमचा तपास सुरु आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपीबरोबर फेसबुकवरुन माझी मैत्री झाली होती असे तक्रारदार तरुणीने पोलिसांना सांगितले. आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले होते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आरोपी तरुणीला दक्षिण मुंबईतील लॉजवर घेऊन गेला, तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला.
त्याने माराहण सुद्धा केली आणि नंतर लग्नाला नकार दिला. तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून तपसाकर्ते आरोपीचं फेसबुक अकाऊंट तपासत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 11:49 am