मुंबई : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कला संचालनालयाने आयोजित के लेल्या चित्रकला  परीक्षांच्या (एलीमेन्ट्री, इंटरमिजीएट) पाच विषयांच्या प्रश्नपत्रिका फोडून समाजमाध्यमांवर व्हायरल के ल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी दोन शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवला.

या परीक्षा २६ आणि २८ सप्टेंबरला होणार होत्या. प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी  नेमलेल्या सात सदस्यीय समितीने तयार के लेल्या प्रश्नपत्रिका चर्नीरोड येथील शासकीय मुद्रणालयात छापून घेण्यात आल्या आणि २३, २४ सप्टेंबरला परीक्षा के द्रांना वाटण्यात आल्या. मात्र २३ सप्टेंबरच्या संध्याकाळी एलीमेंन्ट्रीच्या स्मरण चित्र (मेमरी ड्रॉईंग), स्थिर चित्र (ऑब्जेक्ट ड्रॉईंग) तर इंटरमिजीएट परीक्षेच्या संकल्प चित्र, भुमिती, अक्षर लेखन आदी प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्या. ही बाब लक्षात येताच कला संचालनालयाने परीक्षा पुढे ढकलल्या. परीक्षा केंद्रांकडून प्रश्नपत्रिकांचे संच परत घेतले. यापैकी चेंबूरच्या स्वामी विवेकानंद हायस्कू लने परत केलेल्या संचांची पाकिटे फोडून चिकटवल्याचे समोर आले. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांकडे त्याचवेळी तक्रोर अर्ज करण्यात आला होता. मात्र करोनाकाळात चौकशी लांबली. अखेर शनिवारी पोलिसांनी या प्रकरणी संबंधीत शाळेचे सहायक शिक्षक अमित पोरे, गंगाधर सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.