22 October 2020

News Flash

अभिनेत्री कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात FIR दाखल

कोर्टाने दिला होता आदेश...

(संग्रहित छायाचित्र)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चांडेल विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला आहे. १२४ अ सह विविध कलमांतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाख झाला आहे. वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे.

वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

याचिकाकर्त्यांना आधी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचा आदेश दिला. कंगना बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे विरोधात बोलत असल्याचाही उल्लेख यावेळी कोर्टात करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 8:10 pm

Web Title: fir registered against kangana ranaut and her sister rangoli chandel dmp 82
Next Stories
1 मनसेच्या इशाऱ्यानंतर फ्लिपकार्टने दिलं हे महत्त्वाचं आश्वासन
2 कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा, कोर्टाचा मुंबई पोलिसांना आदेश
3 मुंबईत बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० प्रवासी जखमी
Just Now!
X