27 February 2021

News Flash

मुंबई : काळाचौकी परिसरातील  इमारतीला आग

अभ्युदय नगरच्या मिलान इंडस्ट्रीयल इस्टेट येथे आग लागल्याची घटना

फोटो सौजन्य ANI

काळाचौकी परिसरातील अभ्युदय नगरमधील मिलान इंडस्ट्रीयल इस्टेट येथे एका इमारतीला आग लागल्याची घटना शुक्रवारी  रात्री ११.१५ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले.  आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.

 

मिलान इंडस्ट्रीयल इस्टेट या सहामजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर २६ गाळे आहेत.  इथे अनेक व्यवसाय चालतात. रात्री ११.१५ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठे नुकसान टळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:53 am

Web Title: fire at a building in the kalachowki area abn 97
Next Stories
1 मराठी भाषा येणे महत्त्वाचे की लोकांचा जीव?
2 नागपाडय़ातील आंदोलन मागे घेण्यासाठी महिलांवर दबाव
3 ‘ती’ जमीन देण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर?
Just Now!
X