भिवंडीतील एका केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले असून केमिकलमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आग विझविण्यासाठी २ ते ३ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. जीवित व वित्त हानीबाबत अद्याप काही समजू शकलेले नाही.

भिवंडीतील दापोडा परिसरातील वेदांत वेअर हाऊस असे आग लागलेल्या गोदामाचे नाव आहे. या गोदामात केमिकलचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्याचबरोबर कापडाचे गठ्ठेही तिथे होते. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. पण अचानक आग लागली आणि केमिकलमुळे ती लगेच पसरली. धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले असून केमिकलमुळे उग्र वास पसरला आहे. स्थानिक रहिवाशांना श्वसनास त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरात अनेक गोदामे आहेत.