औद्योगिक वसाहतीमधील सागाव भागातील अल्ट्रा प्युअर केम या रासायनिक कंपनीला शनिवारी सकाळी भीषण आग लागून कंपनी आगीत खाक झाली. कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच, कामगार तात्काळ बाहेर पळाले. त्यामुळे जीवितहानी टळली.

  • चार ते पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
  • सकाळी कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक एका भागाला आग लागली. आगीची माहिती मिळताच कामगार कंपनी बाहेर पळू लागले.
  • आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. बाजुला एलपीजी सिलिंडरचे गोदाम होते. जवानांनी प्रथम या गोदामातील सिलिंडर घटनास्थळारून हटवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
  • कंपनीतील काही रासायनिक भाग पेटत असताना मोठे स्फोट होत होते.  आगीचे निश्चित कारण समजले नाही. आगीत कंपनीचे कोटय़वधीचे नुकसान झाले आहे.