05 July 2020

News Flash

परळच्या गांधी रुग्णालयातील आग आटोक्यात

घटनास्थळी अग्नीशमन दलाचे पाच बंब दाखल झाले आहेत.

परळच्या महात्मा गांधी मेमोरिअल रुग्णालयाच्या तळमजल्यावर सोमवारी दुपारी लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवनांना यश आले. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसून, रुग्णालयातील सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. रुग्णालयाच्या तळ मजल्यात कागदपत्रांना सोमवारी दुपारी आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2016 5:18 pm

Web Title: fire at gandhi hospital in parel
टॅग Fire
Next Stories
1 संशयास्पद मोबाईल सापडल्यामुळे मुंबईत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
2 सबनीसांना भाजपकडून होणारा विरोध झुंडशाहीचे ‘श्रीखंडी’ स्वरूप ?- शिवसेना
3 आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम
Just Now!
X