News Flash

खारघरमध्ये कार शोरूमला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

शोरूममध्ये दोन सुरक्षा जवान अडकले होते.

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

नवी मुंबईतील खारघर येथील आदित्य प्लॅनेट इमारतीतील मारूती सुझुकीच्या शोरूमला लागलेल्या भीषण आगीत दोन सुरक्षारक्षकांचा होरपळून मृत्यू झाला तर सुमारे ८ ते १० कार जळून खाक झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
खारघर सेक्टर १० मधील आदित्य प्लॅनेट इमारतीत आज (रविवार) पहाटेच्या पाचच्या सुमारास आग लागली. परिसरातील लोकांना आग लागल्याचे समजातच त्यांनी अग्निशामक दल व पोलिसांनी याची माहिती दिली. अग्निशामक दलाने त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन इमारतीतील सर्व रहिवाशांना प्रथम बाहेर काढले. शोरूममध्ये दोन सुरक्षा जवान अडकले होते. परंतु, आग भीषण असल्यामुळे आत अडकलेल्या दोन्ही सुरक्षारक्षकांचा यात होरपळून मृत्यू झाला. जितेंद्र कुमार व कृष्ण कुमार अशी मृत सुरक्षारक्षकांची नावे आहेत. ही इमारत सायन-पनवेल महामार्गाला लागूनच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 9:47 am

Web Title: fire at kharghars car showroom two dead
Next Stories
1 मुंबईत आज चारही मार्गांवर मेगाब्लॉक
2 राज ठाकरे यांचे लोकसभानिहाय मेळावे!
3 विरोधकांच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपची मुसंडी!
Just Now!
X