मुंबईच्या वांद्रे परिसरातील लिंकरोड येथे केएफसीचे आऊटलेट असलेल्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मंगळवारी सकाळी शॉटसर्किटमुळे ही आग लागली होती. हवेमुळे ही आग आणखी पसरली आणि केएफसीच्या बाजूला असलेल्या तीन दुकानांमध्येही पसरली. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

kfc-fire-1