मुंबईतील मालाड भागात असलेल्या एका जुन्या बंगल्याला आग लागली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न केले आणि ही आग आटोक्यात आणली. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी आग लागण्याची घटना घडली आहे. आज लागलेल्या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मुंबईतील मालाड भागात पश्चिमेकडच्या मिलाप सिनेमा परिसरात हा जुना बंगला आहे. या बंगल्याला आग कशी लागली ते कारण समजू शकलेले नाही. ही आग आता आटोक्यात आली आहे.
सोमवारीच कामगार रूग्णालयाला लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला. ही आग लागल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत आग लागण्याची दुसरी घटना घडली आहे. बंगल्याला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.