नरिमन पॉइंट येथील मेकर चेंबरमधील सातव्या मजल्यावर एका कंपनीच्या कार्यालयाला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठय़ा शर्थीने तासाभरातच या आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र त्यात अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले. मतदानासाठी कार्यालयांना सुट्टी असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेतली. आठ बंब आणि पाण्याचे आठ टँकर घटनास्थळी रवाना झाले आणि ही आग आटोक्यात आली.