News Flash

गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात आग

पूर्व उपनगरातील महत्त्वाच्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली.

(संग्रहित छायाचित्र)

जीवितहानी नाही; रक्तपेढीतील साहित्याचे नुकसान

पूर्व उपनगरातील महत्त्वाच्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. येथील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रक्तपेढीत ही आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र येथील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या शताब्दी रुग्णालयात गोवंडी-शिवाजी नगर, मानखुर्द, चेंबूर आणि कुर्ला परिसरातील अनेक रुग्ण उपचारांसाठी येत असतात. सध्या पावसाचे आणि पर्यायाने आजारांचे दिवस असल्याने रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल आहेत. याच दरम्यान शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पल्लवी रक्तपेढीत भीषण आग लागली. घटनेच्या वेळी या ठिकाणी तीन कर्मचारी उपस्थित होते.

आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या चार गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. पहाटेची वेळ असल्याने वाहतूक कोंडी कमी होती. त्यामुळे अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत काही मिनिटांतच ही आग आटोक्यात आणली.

आगीवर वेळीच नियंत्रण

वेळीच आगीवर नियत्रंण मिळवल्याने ही आग रुग्णालय परिसरात पसरली नाही. मात्र या आगीत रक्तपेढीतील सर्व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या रक्ताच्या बाटल्या पूर्णपणे सुरिक्षित असल्याची माहिती येथील एका कर्मचाऱ्याने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 3:23 am

Web Title: fire at shantabad hospital in govandi
Next Stories
1 लहान मुलांकडून ‘एमडी’चा पुरवठा
2 आम्ही मुंबईकर : दलित चळवळीचे शक्तिस्थान
3 कर्नाटक पोलिसांमुळेच राज्यात कट्टरवाद्यांच्या विरोधात कारवाई !
Just Now!
X