30 September 2020

News Flash

अंधेरीत एसआरए इमारतीला आग; दोन जणांचा मृत्यू

अंधेरी पश्चिमेला वीरा देसाई मार्गावरील कदम नगर येथील एसआरएस इमारतीच्या १० व्या मजल्यावरील एका घरामध्ये आग लागल्याचे वृत्त आहे.

अंधेरी पश्चिमेला वीरा देसाई मार्गावरील कदम नगर चाळ या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) उभारण्यात आलेल्या इमारतीच्या १० व्या आणि ११ व्या मजल्यावरील घरामध्ये आग लागल्याचे वृत्ता आहे. मंगळवारी रात्री ८.२० च्या सुमारास ही घटना घडली. ट्रान्सकॉन असे या दुर्घटनाग्रस्त एसआरए इमारतीचे नाव आहे. ओबेरॉय टॉवर जवळ ही इमारत आहे.

लेव्हल दोनची ही आग असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. दहाव्या मजल्यावरील १००१ क्रमांकाच्या फ्लॅटला ही आग लागली आहे. दरम्यान, या घरातील इलेक्ट्रॉनिक वायरिंग, इलेक्ट्रिकल वस्तू, काही घरगुती वस्तू आणि लाकडी फर्निचर या आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. त्याचबरोबर अकराव्या मजल्यावरील ११०१ क्रमांकाच्या फ्लॅटलाही या आगीच्या झळांचा फटका बसला आहे. ही एकूण २१ मजल्यांची रहिवासी इमारत आहे.

आग मोठ्या प्रमाणावर पसल्याने फ्लॅट क्रमांक १००१मधील ३ व्यक्ती एका बेडरुममध्ये अडकून पडल्या होत्या. या तिघांनाही अग्निशामकच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे. दुर्देवाची गोष्ट म्हणजे जवानांना याच फ्लॅटमध्ये इतर २ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत.

या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामन दलाकडून कुलिंग प्रक्रियेसाठी २ हायप्रेशर लाइन आणि १ छोटी होज लाइन यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच एक रुग्णवाहिकाही येथे तैनात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 9:57 pm

Web Title: fire at sra building in andheri
Next Stories
1 ‘अवनीच्या शिकाऱ्यांची शिकार महाराष्ट्रच करेल!’
2 मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर सरकारची चालढकल, अजितदादांचा आरोप
3 उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा फक्त मतांसाठी-अशोक चव्हाण
Just Now!
X