ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मुंबई सेंट्रल स्थानकानजीकच्या गोदामाला शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्यासाठी दोन बंब पाठवण्यात आले. आग १५ मिनिटांत आटोक्यात आणली गेली त्यामुळे शेजारच्या बांधकामात आग पसरण्याचा धोका टळला. मात्र या आगीत गोदामातील कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती आहे. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.