News Flash

लोअर परळमधील मथुरादास मिल कम्पाऊंड परिसरात आग

मथुरादास कम्पाऊंड परिसरात काही कार्यालये तसेच कॅफे आहेत. त्याच्या मागे चाळी आहेत. कॅफे झोमधील कर्मचाऱ्यांसाठी तिथे एक खोली होती.

एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोअर परळमधील मथुरादास मिल कम्पाऊंड परिसरातील कॅफ झोमध्ये गुरुवारी सकाळी आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मथुरादास कम्पाऊंड परिसरात काही कार्यालये तसेच कॅफे आहेत. त्याच्या मागे चाळी आहेत. कॅफे झोच्या कर्मचाऱ्यांच्या खोलीत  गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निमशन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:16 pm

Web Title: fire breaks at cafe zoe in mumbai lower parel no casualties reported
Next Stories
1 जेडे हत्याकांड: निकाल ऐकताच छोटा राजन म्हणाला ‘ठीक आहे’
2 आदिवासी पाड्यातील मनसैनिकाच्या घरी जमिनीवर बसून जेवले राज ठाकरे
3 आरेच्या हरित पट्टय़ात ‘सिकाडा’ कीटकाचे दर्शन
Just Now!
X