News Flash

मुंबईत क्रॉफर्ड मार्केटला आग, अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी

आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु

मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटला आग लागली आहे. अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.ANI ने दिलेल्या वृत्तानुसार अग्नीशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. इंदिरा डॉक्स, मांडवी आणि भायखळा येथील अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

या आगीत कोणतंही जीवितहानी झालेली नाही. तसंच कुणालाही इजा झाल्याचं वृत्त अद्याप नाही. संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास महात्मा फुले मार्केटला ही आग लागली आहे. कपड्याच्या काही दुकानांना आग लागली. चार गाळ्यांना आग लागली. फायर चीफ प्रभात रहांगदळे यांनी याबाबत माहिती दिली. आग नियंत्रणात आणणं सुरु आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 7:27 pm

Web Title: fire breaks out at crawford market mumbai 6 fire engines present at the spot scj 81
Next Stories
1 “मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा, मात्र डिझास्टर कंट्रोलरूमची अद्याप जुळवाजुळवच सुरु”
2 ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे – नारायण राणे
3 करोनाचा सामना करण्यासाठी आरएसएसने वाटली सहा लाख घरात होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधे!
Just Now!
X