News Flash

मलबार हिलजवळच्या इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु झालं आहे

मुंबईतील मलबार हिलजवळच्या लास्ट पाम इमारतीला भीषण आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत या इमारतीतून आत्तापर्यंत तिघांना सोडवण्यात आलं आहे. मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे अशी माहितीही समोर आली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या आगीतून आत्तापर्यंत आठ जणांची सुटका करण्यात आली आहे.

ही इमारत ९ मजल्यांची आहे. पाचव्या मजल्यावर आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने फ्लॅट नंबर ५२ ला आग लागली. या इमारतीत २७ फ्लॅट आहेत अशीही माहिती समोर आली आहे. आता या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत आधी तीन जणांना या इमारतीतून वाचवण्यात आलं होतं. आता एकूण आठ जणांची सुटका कऱण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 9:41 pm

Web Title: fire breaks out in a building near hanging gardens at malabar hill mumbai scj 81
Next Stories
1 खिळे जुळवण्याचा काळ गेला, खिळे मारण्याचा काळ सुरु-उद्धव ठाकरे
2 विनायक मेटेंनी दिला शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा
3 “मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये”
Just Now!
X