News Flash

मुंबई – परळमध्ये इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना

परेल परिसरात असणाऱ्या प्रीमिअर चित्रपटगृहाजवळील इमारतीला ही आग लागली आहे

परळ परिसरात इमारतीला आग लागल्याची माहिती मिळत आहे. परळ परिसरात असणाऱ्या प्रीमिअर चित्रपटगृहाजवळील इमारतीला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. याच परिसरातील इमारतीला काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती ज्यामध्ये चौघांना आपला जीव गमवावा लागला होता.

परळ येथील पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयासमोरील क्रिस्टल टॉवर इमारतीच्या बाराव्या मजल्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता, तर १८ रहिवाशी जखमी झाले होते. शुभदा शिर्के, अशोक संपत, साजीव नायर आणि बबलू शेख अशी मृतांची नावे होती. इमारतीत सुरक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 4:59 pm

Web Title: fire breaks out in a building near premier talkies in parel
Next Stories
1 मेट्रो-७ चं काम पूर्ण होईपर्यंत गोरेगाव मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यास बंदी
2 वैभव राऊतसह अटकेत असलेले इतरजण आमचे साधक नाहीत, सनातनचा दावा
3 मुंबईतील ‘त्या’ चौकाला दिले दिवंगत अभिनेते प्राण यांचे नाव
Just Now!
X