11 August 2020

News Flash

भिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग

व्होल्टास कंपनीचे चार गोदामंही जळून खाक

भिवंडीतील गोदामांना लागलेली भीषण आग.

भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलात भीषण आग लागली आहे. गोदामाला लागलेली आग मोठी असल्याने त्या परिसरातील इतर व्होल्टास कंपनीच्या एसी, फ्रिज आणि पंख्याच्या चार गोदामंही जळून खाक झाली आहेत. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून, अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग फार मोठी असल्याने तो संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात अडकला आहे. नक्की ही आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान घटनास्थळी भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगरमधील अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, अग्नीशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2018 6:40 pm

Web Title: fire broke out at a chemicalcompany godown in bhiwandi
Next Stories
1 ‘जय जवान जय किसान’ घोषणेच्या भाजपाने चिंधड्या उडवल्या-उद्धव ठाकरे
2 उमरोळी जवळ रेल्वे रुळाला तडे, पश्चिम रेल्वे अर्धा तास उशिराने
3 सीएसएमटी ते दादर लोकल सेवा उद्या बंद
Just Now!
X