News Flash

मुंबईतील ब्रीच कँडी भागातील शोरुम्सना भीषण आग

भुलाबाई देसाई रोडवर असलेल्या शोरुम्सना अचानक आग लागली, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फोटो सौजन्य-एएनआय

दक्षिण मुंबईतील भुलाबाई देसाई रोडवर असलेल्या प्रेमसन्स हाऊसच्या तीन माळ्यांना शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५ बंब घटनास्थळी रवाना झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न सुरु होते काही वेळापूर्वीच त्यांना ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भुलाबाई देसाई रोडवर असलेल्या शोरुम्सना आग लागली. काही वेळातच आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर पसरले. आग पसरल्याने या शोरुम्समध्ये असलेले सामान जळून खाक झाले. मात्र या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मुंबईत आग लागण्याच्या घटनांचे सत्र डिसेंबर महिन्याच्या शेवटापासूनच सुरु आहे. मोजो ब्रिस्ट्रो आणि वन अबाव्ह या दोन रेस्तराँना लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईत आग लागण्याचे सत्र एप्रिल महिन्यापर्यंत सुरुच आहे असे दिसून येते आहे. आता या घटनेमागे नेमके काय कारण आहे हे समजलेले नाही. मात्र सुदैवाने ही आग लवकर नियंत्रणात आली ही बाब समाधानकारक म्हणावी लागेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 5:47 pm

Web Title: fire broke out at a showroom on bhulabhai desai road mumbai no injuries reported
Next Stories
1 मनमोहन सिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले, हा काळाने भाजपावर घेतलेला सूड – उद्धव ठाकरे
2 लोकलमधून पडून तरुणी गंभीर जखमी
3 एसटी भाडेवाढीच्या उंबरठय़ावर
Just Now!
X