News Flash

मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या इमारतीला लागलेली आग विझवण्यात यश

मुंबईच्या वांद्रे- कुर्ला संकुलातील रिझर्व्ह बँकेच्या इमारतीला शुक्रवारी सकाळी आग लागली.

मुंबईच्या वांद्रे- कुर्ला संकुलातील रिझर्व्ह बँकेच्या इमारतीला शुक्रवारी सकाळी लागलेली  अग्निशमन दलाने सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर विझवली .  आज सकाळी साडेआठच्या सुमारास इमारतीच्या आठव्या मजल्यावर अचानकपणे ही आग लागली.  या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे चार टँकर्स तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुमारे तासभर ही आग विझवण्याचे प्रयत्त सुरू होते.  सकाळची वेळ असल्यामुळे इमारतीत फारसे कर्मचारी नव्हते. त्यामुळे जिवीतहानी होण्याचा धोका टळला. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली आणि या आगीत किती नुकसान झाले, याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 9:53 am

Web Title: fire broke out at rbi building in bandra kurla complex
Next Stories
1 चुनाभट्टीजवळ लोकल ट्रेन बंद पडल्याने हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत
2 आमचा माखनचोर!
3 दुष्काळाचा सामना कसा करणार?
Just Now!
X