18 September 2020

News Flash

मानखुर्दमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही

भंगार गोदामाला लागलेली आग- फोटो सौजन्य-ANI

मुंबईतील मानखुर्द भागात असलेल्या भंगार गोडाऊनला आग लागली आहे. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाचे ४ बंब आग नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत. ही आग नेमकी का लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. या आगीचे लोळ इतक्या मोठ्या प्रमाणावर आकाशात पसरले होते की घाटकोपरमधूनही ही आग पाहाता येत होती.

भंगार गोदामाला लागलेली ही आग पसरू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. या गोडाऊनच्या बाजूला केमिकलची आणि इतर भंगार सामानाची गोडाऊन आहेत. त्यामुळे प्रयत्नांची शर्थ करून ही आग नियंत्रणात आणावी लागते आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मानखुर्द येथील भंगार गोडाऊनला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. आता लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2017 4:29 pm

Web Title: fire broke out in a scrap godown in mankhurd
Next Stories
1 एका दिवसात ९६९ विमानांचं टेक ऑफ, लँडिंग; मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम
2 २६/११: ‘वडिलांची आठवण आली नाही असा एकही दिवस नाही’
3 प्लास्टिकबंदीचा घोळ संपेना!
Just Now!
X