News Flash

मुंबईतील भेंडी बाजार भागात इमारतीला भीषण आग

पहाटे चारच्या सुमारास लागली होती आग

मुंबईतील भेडी बाजार भागात असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागली. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली. इस्माईल असं या इमारतीचं नाव आहे. पहाटे चारच्या सुमारास या इमारतीतील एका दुकानाला आगल लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अथक प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलं.

दरम्यान लागलेली आग ही इतकी भीषण होती की या इमारतीच्या जवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १० बाईक आणि दोन कार यांचीही राख झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक पयत्न करुन ही आग आटोक्यात आणली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 9:02 am

Web Title: fire broke out in ismail building at bhendi bazar early morning today no injuries casualties reported scj 81
Next Stories
1 ओला दुष्काळ जाहीर करा!
2 सेनेला महाआघाडीचा ‘हात’!
3 जे ठरले तेच हवे – उद्धव ठाकरे
Just Now!
X