मुंबईतील अंधेरी पश्चिमेला असलेल्या एका व्यावसायिक इमारतीमध्ये आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. वीरा देसाई रोडवर ही २२ मजली इमारत असून, ६व्या मजल्यावर आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीमध्ये अनेक लोक अडकले असल्याचे वृत्त आहे.

मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातील वीरा देसाई रोडवर पेनिन्सुला ही २२ मजली व्यावसायिक इमारत आहे. सोमवारी दुपारी अचानक इमारतीच्या ६व्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर आगीच्या लोळासह धुरीचे लोट बाहेर येऊ लागल्यानंतर परिसरात धावपळ सुरू झाली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान चार बंबासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच नागरिकांना सुखरूप बचावकार्य हाती घेतले आहे. आतापर्यंत तीन जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, अनेक जण इमारतीमध्ये अडकून पडले असल्याची माहिती आहे.