दक्षिण मुंबईच्या बलार्ड पीअर परिसरात एक्सचेंज नावाच्या शासकीय इमारतीच्या तिस-या मजल्यावर आज (बुधवार) सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत अद्याप कोणतीही जीवीत हानी अथवा इमारतीत कुणी अडकल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी शॉट सर्कीटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.   
कार्यालये सुरू असताना अचानक आग लागल्याने इमारतीमध्ये अनेक जण उपस्थित होते. मात्र सर्वांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मुंबईतील प्रमुख आणि सर्वात मोठे रेल्वे स्थानक असलेल्या छत्रपती शिजाजी टर्मिनस नजीकच्या परिसरात ही इमारत आहे.
केंद्र सरकारच्या नार्कोटीक्स आणि जनगणना विभागाची कार्यालये या इमारतीमध्ये आहेत.