18 November 2018

News Flash

मालाडमधील बॉम्बे टॉकीज परिसरात भीषण आग

एका लाकडाच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे

मालाडमधील सोमवार बाजार परिसरात परिसरात भीषण आग लागली आहे. एका लाकडाच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आजूबाजूला अनेक दुकानं असून आग पसरु नये यासाठी अग्निशन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान आगीमुळे परिसात धुराचे लोट पसरले आहेत. सकाळी ११ च्या सुमारास ही आग लागली असून आजूबाजूच्या लोकांमुळे आग लागल्याचं लक्षात आलं. आग लागलेल्या ठिकाणी अनेक दुकानं असून तेथून लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.

First Published on September 4, 2018 12:07 pm

Web Title: fire in malad