News Flash

मुंबई – फोर्ट परिसरातील इमारतीमध्ये भीषण आग, १८ गाड्या घटनास्थळी

पटेल चेंबर्समध्ये ही आग लागली असून आग वाढत चालली आहे

फोर्ट परिसरातील इमारतीत भीषण आग लागली आहे. पटेल चेंबर्समध्ये ही आग लागली असून आग वाढत चालली आहे. अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पहाटे पाच वाजता ही आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आगीमुळे इमारतीचा काही भाग कोसळला असल्याची माहिती मिळत आहे. इमारतीचा भाग कोसळल्याने अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 6:41 am

Web Title: fire in menshan kothari building of fort
Next Stories
1 ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर, सातपैकी पाच खासदार महाराष्ट्राचे
2 पुढील वर्षांपासून दहावीतील गुणांची खैरात बंद
3 ‘आषाढी यात्रेसाठी पारंपरिक नियोजनात बदल गरजेचा’
Just Now!
X