News Flash

मुंबईतील आगीत दोघांचा मृत्यू; एक बेपत्ता

साकीनाका येथील खैरानी रोडवरील दोन गाळ्यांना आग लागली होती.

मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे शुक्रवारी लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश असून त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

शुक्रवारी संध्याकाळी साकीनाका येथील खैरानी रोडवरील दोन गाळ्यांना आग लागली. दरम्यान, या ठिकाणी लाकडांची आणि रसायनांची गोदामं असल्यानं आग मोठ्या प्रमाणात पसरली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. परंतु दाटीवाटीच्या भागामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत होत्या.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरातील वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला होता. या घटनेत ३० ते ३५ गाळे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण अद्यापही बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 8:21 am

Web Title: fire in mumbai sakinaka khairani road in control mumbai frire brigade jud 87
Next Stories
1 मुंबई महानगराचा विकास म्हणजे केवळ काँक्रीटीकरण नव्हे – मुख्यंमत्री
2 भाजपच्या कोंडीसाठी महाविकास आघाडीचे ‘मिशन विदर्भ’
3 विद्यापीठाकडून चुकीच्या मूल्यांकनाचे घोळसत्र कायम
Just Now!
X